*मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी केली पाहणी*

*मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी केली पाहणी*

*कोंकण एक्सप्रेस*

*मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी केली पाहणी*

*सिंधुदुर्गनगरी दि 16 (जिमाका)*

सार्व‍जनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी मालवण येथील राजकोट किल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आणि परीसराची पाहणी केली. 14 व 15 जून 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा व मालवण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चबुतऱ्याच्या बाजूने भरलेला मातीचा भराव (Backfilling) किंचित प्रमाणात खचला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व चबुतरा पूर्णपणे मजबूत, सुरक्षित आणि सुस्थितीत आहे. चबुतऱ्याच्या मुख्य रचनेवर किंवा पुतळ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही असे मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्यांच्या भोवतालचा परिसर यांची नियमित देखभाल आणि सुरक्षा परीक्षण या विभागामार्फत नियमानुसार सातत्याने करण्यात येते. सदर खचलेला भाग तात्काळ दुरुस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरु करण्यात आल्या असून हे काम अत्यंत तत्परतेने या विभागाकडून करण्यात येत असल्याची माहिती सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.

यावेळी अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, उप अभियंता अजित पाटील, मे. राम सुतार आर्ट क्रिएशनचे प्रतिनिधी त्रिविक्रम प्रभुगावकर, स्वातंत्र्य गुणवत्ता सल्लागार सी.एन. कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता सुरज गिरी, अभियंता श्री बावणे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!