*करूळ  घाटात दरड कोसळली दरडी बरोबर मातीचा ढिगारा रस्त्यावर* 

*करूळ  घाटात दरड कोसळली दरडी बरोबर मातीचा ढिगारा रस्त्यावर* 

*कोंकण एक्सप्रेस*

*करूळ  घाटात दरड कोसळली दरडी बरोबर मातीचा ढिगारा रस्त्यावर* 

*वैभववाडी प्रतिनिधी : संजय शेळके*

वैभववाडी तालुक्यात गेली दोन ते तीन दिवस पडणाऱ्या सततच्या मुसळधार पावसाचा फटका करूळ घाटाला बसला असून सोमवारी सकाळी करूळ घाटात भल्या मोठा मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने संपूर्ण वाहतूक टप्पू झाली होती 9 तासाच्या आतक प्रयत्नाने सायंकाळी घाटातील मातीचा ढिगारा बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
विजयदुर्ग कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक टप्पे झाली होती दरडीचा मातीचा ढिगारा रस्त्यावर आला होता संबंधित यंत्रणेच्या मार्फत दरड हटवण्याचे काम युद्धपात्र सुरू होते मार्ग बंद झाल्याने लांब पल्ल्याच्या पर जिल्ह्यात जाणारे गाड्या भुईबावडा व फोंडा घाट मार्गे वळवण्यात आल्या होत्या.


गेली दोन ते तीन दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे नदी व नाले तोडून भरून वाहत आहेत अति दृष्टीचा फटका करूळ घाटाला बसला आहे सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान करूळ  घाटात दरड कोसळली दरडी बरोबर मातीचा ढिगारा रस्त्यावर आला आहे दरड कोसळण्याची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्गाचे वाहतूक पोलीस तसेच ठेकेदार आर बी वेल्हाळ कंपनीचे कर्मचारी दाखल झाले होते चार जेसीबीच्या साह्याने दरड व मातीचा ढगाळ हटवण्याचे काम युद्धपाच सुरू केले अखेर नऊ तासाच्या अथक प्रयत्नानंतर सायंकाळी 5 वा नंतर घाटातील वाहतूक सुरळीत करण्यात आली. मागील 24 तासात वैभववाडी तालुक्यात 122 मीटर पावसाची नोंद झाली आहे तर आत्तापर्यंत 497 मिलिमीटर पाऊस तालुक्यात पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!