*कोंकण एक्सप्रेस*
*शहराला नवी दिशा देण्यासाठी प्रयत्न करणार-सचिन वालावलकर*
*कॅम्प मैदानावर भव्य वृक्षारोपण संपन्न*
*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*
ग्लोबल वार्मिगवर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान वर्षाला एकतरी झाड लावून ते जगवले पाहिजे. वेंगुर्ला शहरात पर्यटनावर आधारित विकासाची नवी दिशा देण्यासाठी दिपक केसरकर यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील असे आश्वासन सिधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन वालावलकर यांनी दिले.
वेंगुर्ला येथील सचिन वालावलकर मित्रमंडळ आणि वेंगुर्ला नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्प स्टेडियमवर १४ जून रोजी भव्य वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपणावेळी नारळ, काजू, आंबा, फणस, चिकु, कोकम, पेरू, बदाम, जांभुळ, कौटी चाफा, चाफा अशा फळ व फुलझाडांची लागवड करण्यात आली. यावेळी सिधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन वालावलकर, शिदेसेनेचे शहरप्रमुख उमेश येरम, नगरपरिषदेचे प्रविण कांबळी, सागर चौधरी, कलावलचे अध्यक्ष बाळू खामकर सचिन वालावलकर मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष परब, उपाध्यक्ष अॅड.मनीष सातार्डेकर, सदस्य संदेश रेडकर, शैलेश केसरकर, लवू गावडे, प्रशांत सावंत, जयंत सावंत, जयेश गावडे, पिटू कुडपकर, बाळा आरावंदेकर, किशोर घाडी, विशाल राऊत, यशवंत किनळेकर, संजय परब, राजू परब, मणी रेवणकर, देवीदास वालावलकर, सुचित परब, क्रीडा प्रशिक्षक संजिवनी परब, जया चुडनाईक आदी उपस्थित होते.