शाळा क्र. ३ची जमीन भालचंद्र महाराज संस्थानाला हस्तांतरित करण्याबाबत १ एप्रिला बैठक

शाळा क्र. ३ची जमीन भालचंद्र महाराज संस्थानाला हस्तांतरित करण्याबाबत १ एप्रिला बैठक

*कोकण Express*

*शाळा क्र. ३ची जमीन भालचंद्र महाराज संस्थानाला हस्तांतरित करण्याबाबत १ एप्रिला बैठक…!*

*नगरसेवक सुशांत नाईक*

*कणकवल ःःप्रतिनिधी* 

प.पू.भालचंद्र महाराज शाळा क्रमांक ३ची जमीन भालचंद्र महाराज संस्थानाला हस्तांतरित करण्याबाबत १ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजता सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गटनेते नगरसेवक सुशांत नाईक यांनी दिली.

याबाबत नुकतीच आमदार वैभव नाईक आणि शिवसेना नेते संदेश पारकर यांची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक घेवून लक्ष वेधले होते. या बैठकीच्या अनुषगाने ही बैठक आयोजित करण्यात आली असून यावेळी आमदार वैभव नाईक, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, कणकवली तहसीलदार आर. जे. पवार, मुख्याधिकारी वैभव साबळे आदी उपस्थित राहणार आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी या बैठकीबाबत संबंधितांना सूचना दिल्याची माहिती श्री.नाईक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!