*कोंकण एक्सप्रेस*
*गोपुरी आश्रम येथे टेबल टेनिस प्रशिक्षण शिबिर संपन्न*
*कणकवली-प्रतिनिधी*
दिनांक 1 जून ते 10 जून या कालावधीत शालेय मुलांना टेबल टेनिस या खेळाची ओळख व्हावी व शालेय स्पर्धा व इतर स्पर्धासाठी खेळाडू तयार व्हावेत यासाठी गोपूरी आश्रम मार्फत टेबल टेनिस कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्यांना नितीन तळेकर सर यांनी प्रशिक्षण दिले तसेच महा सिंधू टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष व प्रशिक्षक विष्णू कोरगावकर सर व त्यांचे सहकारी पिंगुळकर सर वालकर सर व मालवण मधील खेळाडू यांनीही उपस्थिती दर्शवून येथील मुलांना मार्गदर्शन केले.
सिंधुदुर्गातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू घडावेत यासाठी महा सिंधू टेबल टेनिस असोसिएशन कडून सर्वतोपरी सहाय्य करू असे आश्वासन समारोप प्रसंगी श्री कोरगावकर सर यांनी दिले प्रशिक्षण शिबीर यशस्वी केल्याबद्दल व गोपुरी आश्रम चे सचिव बाळू मेस्त्री यांनी तळेकर सर व कोरगावकर सर यांचे आभार मानले व गोपुरीत यापुढे कायमस्वरूपी टेबल टेनिस प्रशिक्षण मुले महिलांसाठी सुरू राहील असे सांगितले. व यासाठी गोपुरी आश्रमशी संपर्क करावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉ राजेंद्र मुंबरकर यांनी केले.