*दाभोली येथे फॅक्टरी जवळ मुख्य रस्त्यावर दरड कोसळली*

*दाभोली येथे फॅक्टरी जवळ मुख्य रस्त्यावर दरड कोसळली*

*कोंकण एक्सप्रेस*

*दाभोली येथे फॅक्टरी जवळ मुख्य रस्त्यावर दरड कोसळली*

*सुदैवाने त्या वेळी वाहतूक नसल्याने मोठा अनर्थ टळला*

*वेंगुर्ले प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*

रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वेंगुर्ले मालवण सागरी महामार्गावरील दाभोली येथे फॅक्टरी जवळ मुख्य रस्त्यावर दरड कोसळली आहे. सुदैवाने यावेळी वाहतूक नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
ही दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक सकाळ पर्यंत ठप्प झाली होती.
वेंगुर्ले गुड मॉर्निंग ग्रुप ने जपली सामाजिक बांधिलकी…
वेंगुर्ले गुड मॉर्निंग ग्रुप त्या मार्गाने सकाळी जात होता. त्यांनी ही कोसळलेली दरड पहिली आणि सामाजिक बांधिलकी जपत एका बाजूने काही दगड बाजूला करून लहान गाड्यांसाठी रस्ता मोकळा केला. त्यांच्या कृतीचे अभिनंदन होत आहे.
या ग्रुप मधील बाळा परुळेकर, नवीन भोने, संजय वैद्य, प्रशांत नेरुरकर, सेजल भाटकर, विक्रम गाडी, प्रकाश भानुषाली, राजा रेडकर, आनंद बोवलेकर, मिलिंद शिवलकर, संतोष साळगावकर, संजय भाटकर यांनी या मदत कार्यात सहभाग घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता केला मोकळासार्वजनिक बांधकाम विभागाला या घटनेबाबत माहिती मिळताच सकाळी हा रस्ता जेसीबी च्या साह्याने मोकळा केला त्यामुळे आता वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!