*कोंकण एक्सप्रेस*
*इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अनेक लष्करी अधिकाऱ्यांसह सहा अणुशास्त्रज्ञांचा मृत्यू, आण्विक तळही उद्ध्वस्त*
इस्रायलने शुक्रवारी पहाटे इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यामुळे मध्य-पूर्वेत तणाव निर्माण झाला आहे. इस्रायली हवाई दलाने तेहरानमधील इराणच्या अनेक लष्करी तळांना व इराणमधील आण्विक तळांना लक्ष्य केलं.
पाठोपाठ इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ सुरू केल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, आत इस्रायली हल्ल्यात इराणमध्ये झालेल्या नुकसानाची माहिती समोर येत आहे.
इस्रायली हल्ल्यात इराणच्या लष्करातील अनेक मोठे अधिकारी व अणूशास्त्रज्ञ ठार झाल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे.
इराणी माध्यमे व प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे की नातान्झ प्रांतातील इराणच्या प्राथमिक युरेनियम शुद्धीकरण प्रकल्पात मोठा स्फोट झाला आहे. यावर इराणकडूनही प्रत्युत्तर मिळू शकतं. तत्पूर्वी इस्रायलने आणीबाणी जाहीर केली असून लष्करी दलांना अलर्ट केलं आहे.
आयुतुल्ला अली खोमेनींकडून इस्रायलचा निषेध
इराणचे सर्वोच्च नेते आयुतुल्ला अली खोमेनी यांनी या हल्ल्याला ‘क्रूर व रक्तरंजित कृती’ म्हटलं आहे.
या हल्ल्याचा निषेध नोंदवत खोमेनी म्हणाले, “इराणविरोधात इस्रायलने केलेल्या या कारवाईचे त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील”. इस्रायल-इराण संघर्षादरम्यान अनेक देशांनी इराण व इस्रायलचं हवाई क्षेत्र मोकळं केलं आहे
.