*प्रसाद खडपकर यांना व्यासंगी वाचक पुरस्कार जाहीर*

*प्रसाद खडपकर यांना व्यासंगी वाचक पुरस्कार जाहीर*

*कोंकण एक्सप्रेस*

*प्रसाद खडपकर यांना व्यासंगी वाचक पुरस्कार जाहीर*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*

नगर वाचनालय, वेंगुर्ला संस्थेतर्फे सन २००४ पासून कै.श्रीराम मंत्री यांच्या कायम निधीतून सुदत्त कल्याण निधी पुरस्कृत व्यासंगी वाचक पुरस्कार देण्यात येत आहे. यावर्षी संस्थेचे वर्गणीदार सभासद प्रसाद विश्वनाथ खडपकर हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक असे पुरस्काराचे स्वरूप असून २२ जून रोजी कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ.शरयू आसोलकर यांच्या हस्ते श्री.खडपकर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!