*कोंकण एक्सप्रेस*
*वीज वितरण पोल घराला लागून असल्याने धोका*
*पोल शिफ्टिंग न झाल्यास जीवाला धोका*
*वेंगुर्ले: प्रथमेश गुरव*
शिरोडा केरवाडा येथील रहिवासी हरी उर्फ चंद्रकांत कृष्णा बटा यांच्या घराला लागून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा थ्रि फेज वीज वाहिनीचा पोल असून त्यावरील वीज वाहिन्या वारंवार तुटत असल्याने असल्याने घरातील रहिवाश्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे हा धोकादायक पोल लवकरात लवकर अन्य जागी उभारून सहकार्य करण्याचे आवाहन हरी बटा यांनी वीज वितरण कंपनीकडे केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, माझ्या घराला लागून असलेल्या या पोल वरून थ्री फेज वीज वाहिनी माझ्या घरावरून गेलेली आहे. तसेच जवळपास दहा ते बारा घरांमध्ये या पोलवरून सर्व्हिस वायर कनेक्शन दिलेली असल्यामुळे पोलवर वायरचा गुंता वाढलेला आहे. तसेच एका पोलवर प्रमाणापेक्षा घरांमध्ये कनेक्शन दिली असल्यामुळे काही बिघाड झाल्यास आणि हा पोल माझ्या घराला लागून असल्यामुळे वायरमन ला सुद्धा त्यावर चढून दुरुस्ती करणे म्हणजे एक प्रकारची कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत वायरमन जीवावर उदार होऊन या पोलवर चढून लोकांच्या समस्या सोडवत आहेत.
याठिकाणच्या त्या सर्व वीज वाहिन्या १९८० साली पहिली लाईन केरवाडी मध्ये जोडली तेव्हापासून या सर्व वीज वाहिन्या जीर्ण झालेल्या असल्याने वारंवार तुटत असतात. याबाबत मी गेली २ ते ४ वर्ष तक्रारी करत आहे. यावेळी वीज वितरणच्या शिरोडा कार्यालयाचे श्री विहिरे यांनी प्रत्यक्ष पाहणे करून सदरील घरावरील वीज वाहिनी सोबत पोल घराच्या अडचणीत असल्यामुळे तसेच वायरमनला चढणे शक्य नसल्यामुळे पोल शिफ्टिंग करणे गरजेचे असल्याचे सांगितले होते.
दिनांक २० मे रोजी अवकाळी पाऊस सुरू झाल्यावर दिनांक २२ मे रोजी रात्री मी आणि माझी बायको दोघेही आम्ही ६५ वर्षे पार केलेले घरात असताना पायांना झिणझिण्या कशा येतात म्हणून सरळ घराबाहेर येऊन पाहिले असता, एक वायर तुटून घरावरून जमिनीवर पडली होती. यावेळी लगेच वायरमनला बोलून लाईट बंद करायला लावली. दैव बलत तर म्हणून प्रसंग टळला. पुढे तर पूर्ण पावसाळा आहे वारे पाऊस विजांचा कडकडाट चालू राहिला तरी अशा प्रसंगी जीवालाही धोका होऊ शकतो. म्हणून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने यावर लवकरात लवकर योग्य तोडगा काढून आमच्या डोक्यावर घोंगावणारे हे वादळ शांत होण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी श्री. बटा यांनी केली आहे.