*कोकण Express*
*पं. स. सभापती मनोज रावराणे यांच्या निधीतून घोणसरी एस. टी. स्टँड येथे बसविण्यात आलेल्या हायमास्ट चे उद्घाटन*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांच्या निधीतून घोणसरी एस. टी. स्टँड येथे बसविण्यात आलेल्या हायमास्ट चे उद्घाटन घोणसरी ग सरपंच सौ.मृणाल मकरंद पारकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
घोणसरी एसटी स्टँड हा भाग नेहमी वर्दळीचा आणि गजबजलेला असतो. ग्रामस्थांची ये जा असल्यामुळे येथे हायमास्ट बसवावा अशी मागणी सरपंच मृणाल पारकर यांनी केली होती. भाजपा तालुका उपाध्यक्ष मकरंद उर्फ छोटू पारकर यांनी याकामी पाठपुरावा केला होता. आपल्या मतदारसंघातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी मी नेहमीच कटीबद्ध आहे. घोणसरी गावच्या ग्रामस्थांची मागणी पूर्ण केल्याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया यावेळी सभापती मनोज रावराणे यांनी व्यक्त केली. हायमास्ट मुळे घोणसरी एसटी स्टँड उजळून निघाले आहे. यापुढेही सभापती रावराणे यांनी गावच्या विकासकामे तडीस नेण्यासाठी सहकार्य करावे. हायमास्ट उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करत असल्याचे सरपंच पारकर म्हणाल्या.
यावेळी पं.स.सभापती श्री. मनोज रावराणे, भाजपा कणकवली तालुका उपाध्यक्ष श्री मकरंद पारकर,तालुका कार्यकारणी सदस्य श्री.रविंद्र सावंत,भाजपा कणकवली तालुका सोशल मीडिया सदस्य नितीन पारकर, लोरे – घोणसरी ओबीसी सेलचे शक्तीकेंद्र प्रमुख श्री.दत्ताराम गुरव,भाजपा घोणसरी बूथ २३३ चे अध्यक्ष श्री संजय शिंदे,माजी सरपंच श्री. मॅक्सी पिंटो,दूध डेअरी चेअरमन श्री.गणेश परब,घोणसरी हायस्कूल चे चेअरमन श्री. भाई राणे,माजी ग्रा. पं.सदस्य श्री समीर राणे,योगेश जंगम,माजी बूथ अध्यक्ष श्री कृष्णा पेडणेकर,उमेश इंदुलकर,प्रशांत सावंत, अँथोनी पिंटो,शामु घाडी,एकनाथ परब,अनिल राणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.