*प्रा. हरीभाऊ भिसे यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गौरव*

*प्रा. हरीभाऊ भिसे यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गौरव*

*कोंकण एक्सप्रेस*

*प्रा. हरीभाऊ भिसे यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गौरव*

*भिसे सर हे शैक्षणिक क्षेत्रासोबत सामाजिक, सांस्कृतिक,सहकार या क्षेत्रांमधून जिल्हा प्रशासनाशी नाळ जोडलेले हरहुन्नरी व्यक्तिमत्व -प्रांताधिकारी जगदीश कातकर*

*कणकवली ः प्रतिनिधी*

प्रा. हरीभाऊ भिसे हे शिक्षण प्रसारक मंडळाच्या 53 वर्षाच्या दैदीप्यमान परंपरा असलेल्या कणकवली कॉलेज कणकवली मधून 35 वर्षाची प्रदीर्घ सेवा करून निवृत्त झाले त्याबद्दल कणकवली तहसीलदार मा. दीक्षांत देशपांडे आणि प्रांताधिकारी मा.जगदीश कातकर यांच्या शुभहस्ते प्रा. हरीभाऊ भिसे यांचा महसूल प्रशासनातर्फे गौरव करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार मंगेश यादव साहेब, नायब तहसीलदार दिलीप पाटील, आणि महसूल अधिकारी श्री.मंडले आणि श्री.खाडे, श्री. माळवे, मा.हेमलता तोरस्कर मॅडम, अच्युतराव वनवे सर महसूल सहाय्यक आणि इतर महसूल कर्मचारी उपस्थित होते. यावेळी दिलीप पाटील मा.दीक्षांत देशपांडे तहसीलदार कणकवली माननीय प्रांताधिकारी जगदीश कातकर साहेब यांनी गौरवपूर्ण उदगार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागावकर साहेब यांनी केले. यासोबतच शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली कॉलेज कणकवली च्या वतीने संस्थेचे सचिव मा. विजयकुमार वळंजु, प्राचार्य युवराज महालिंगे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे व आयडियल नर्सिंग स्कूल कणकवली या दोन्ही ठिकाणी डॉ. विद्याधर तायशेटे श्री बुलंद पटेल डॉ.अनिल ठाकूर, निलेश महेंद्रकर संस्थेचे सीईओ डीपी तानवडे प्रशालेच्या मुख्याध्यापिका अर्चना देसाई व शिक्षक वृंद उपस्थित होते
त्याचबरोबर मुख्याधिकारी कणकवली मा.गौरी पाटील यांच्या शुभहस्ते नगरपंचायतीच्या वतीने त्यांना हृदयपूर्वक गौरवण्यात आले तसेच प्रा.हरीभाऊ भिसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी मा. जगदीश कातकर साहेब ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर , दादा कुडतरकर तसेच नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
याशिवाय एन बी एस चॅरिटेबल ट्रस्ट कणकवली संचलित सिंधुगर्जना ढोल ताशा पथकाचे वादक वतीने आणि रंगखांब कणकवली ग्रुपच्या कलाकारांच्या वतीने देखील सत्कार करण्यात आला यावेळी श्री. विलास खानोलकर,निलेश पवार,श्रीधर पाचंगे,किशोर कदम,नेत्रा पाचंगे आणि सर्व कलाकारांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला, तसेच भजनी कलावंत जिल्हा कलाकार संघटनेच्या वतीने प्रा. हरीभाऊ भिसे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, प्रकाश पारकर आणि जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आलेले भजनी बुवा उपस्थित होते.
जिल्हा ह्युमन राइट्स च्या राष्ट्रीय अध्यक्ष श्रुतिका कडू यांच्या हस्ते देखील त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हा ह्यूमन राइट्स संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!