*कोंकण एक्सप्रेस*
*देवजी ट्रस्टतर्फे भेटवस्तू वाटप व सत्कार समारंभ*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
ग्रामीण भागातील विशेषतः मच्छिमार माताभगिनी तसेच शालेय विद्यार्थी व युवक यांच्यासाठी कार्य करण्याच्या हेतूने स्थापन केलेल्या लक्ष्मी शंकर देवजी चॅरिटेबल ट्रस्टचा भेटवस्तू वाटप व सत्कार समारंभ हा पहिलाच कार्यक्रम सद्गुरू नारायण महाराज मंदिर उभादांडा-कुर्लेवाडी येथे संपन्न झाला.
यावेळी ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प.सावळाराम कुर्ले, प्रमोद धावडे, विजय तांडेल, किशोर रेवणकर, दिलीप कुर्ले, दिवाकर कुर्ले, गजानन कुबल, ग्रामपंचायत सदस्य नम्रता कुर्ले, अभिमन्यू भूते, दाजी सावंत, हेमंत चव्हाण, ट्रस्टच्या सचिव अक्षता देवजी, सल्लागार रामचंद्र देवजी, किशोर सोन्सुरकर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात कुर्लेवाडीतील ५० ज्येष्ठ माताभगिनींना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच येथील दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. हुशार व होतकरू विद्यार्थी लक्ष्मण अभिमन्यू भूते याने एमपीएससी परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन करून सिधुदुर्ग पाटबंधारे विभागामध्ये सहाय्यक अभियंता पदावर वर्णी लागल्याबद्दल त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. लवकरच ट्रस्टच्यावतीने होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला जाईल असे सचिव अक्षता देवजी यांनी जाहीर केले.