*कोंकण एक्सप्रेस*
*गौड सारस्वत ब्राह्मण समाजातर्फे विद्यार्थी गुणगौरव*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
गौड सारस्वत ब्राह्मण समाज वेंगुर्ल्याच्यावतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणा-या सिधुदुर्ग जिल्ह्यातील समाजबांधवांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गौरव करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी पात्र विद्यार्थ्यांनी किवा त्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांचे गुणपत्रक, मोबाईल नंबरसह सुजाता पडवळ (९०१११८८५४२) किवा संजय पुनाळेकर (९४२२४३४८७४) या नंबरवर १२ जूनपर्यंत पाठवावेत. गुणगौरव समारंभ रविवार दि. १५ जून रोजी स्वामिनी मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे सकाळी १० वाजता संपन्न होईल.