सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी संजय शेडगे तर सचिवपदी अमोल पाटील यांची निवड

सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी संजय शेडगे तर सचिवपदी अमोल पाटील यांची निवड

*कोकण Express*

*सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी संजय शेडगे तर सचिवपदी अमोल पाटील यांची निवड*

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ व महिला सेलची जम्बो कार्यकारिणी जाहीर*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

जगातील 167 देशांमध्ये कार्यरत असलेल्या एजुकेशनल इंटरनशनंल या आंतरराष्ट्रीय शिक्षक संघटनेशी संलग्न असलेल्या अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या सावंतवाडी तालुक्याची जम्बो कार्यकारिणी मोठ्या उत्साहात तालुकध्यक्ष श्री.पुरुषोत्तम शेणई यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली.यावेळी नूतन तालुकध्यक्षपदी श्री.संजय शेडगे तर सचिवपदी श्री.अमोल पाटील तसेच महिला सेल तालुकध्यक्षपदी श्रीम.वंदना सावंत तर सचिवपदी श्रीम.तेजस्विता वेंगुर्लेकर याची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली.महाराष्ट्र शासनाच्या कोडीव संदर्भातील आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन करून व शासकीय परवानगीने श्री खानोलकर मंगल कार्यालय मळगाव येथे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी मोठ्या उत्साहात मेळाव्याद्वारे जाहीर ककरण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब म्हणाले की, अखिल महारष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटना ही केवळ शिक्षकांच्या हक्कासाठी न भांडता कर्तव्य व सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून वेळोवेळी रक्तदान शिबीर, विविध आरोग्य शिबीरे, पूरग्रस्त मदत, कोरोन काळात गरजूंना जीवनावश्यक वस्तू व धान्य वाटप, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असे विविध समाजोपयोगी, शैक्षणिक उपक्रम राबवीत असते असे कार्य करणारी ही एकमेव शिक्षक संघटना आहे.आणि अशा संघटनेच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाणे ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. शिक्षकांचे प्रश्न, अडचणी सोडविण्यासाठी राजकीय स्तरावर आपण संघटनेसोबत आहे. गत कार्यकारणीला व नूतन कार्यकारणीला शैक्षणिक सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा आहेत.”
यानंतर राज्य संयुक्त चिटणीस श्री. म ल देसाई यांनी तालुकास्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली संघटना कशा व कोणकोणत्या प्रकारे शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी कशी काम करते याचा आढावा सांगितला. संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे विविध प्रश्न कशाप्रकारे सोडवले, सध्या शिक्षक बांधवाना असणार्या अडचणी व समस्या सोडवण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न याचा अभ्यासपूर्ण आढावा आपल्या मार्गदर्शनात घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!