जागतिक सायकल दिनानिमित्त कणकवलीत सायकल रॅली* कनक रायडर्स सायकल क्लबचे आयोजन

जागतिक सायकल दिनानिमित्त कणकवलीत सायकल रॅली* कनक रायडर्स सायकल क्लबचे आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*जागतिक सायकल दिनानिमित्त कणकवलीत सायकल रॅली*
कनक रायडर्स सायकल क्लबचे आयोजन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

जागतिक सायकल दिनाचे (३ जून) औचित्य साधून कनक रायडर्स सायकल क्लबच्या सदस्यांनी मंगळवारी सकाळी कणकवली शहरामध्ये सायकल रॅलीचे आयोजन केले होते. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सायकलचा वापर जास्तीत जास्त करून इंधनाची बचत व त्याच अनुषंगाने पर्यावरणाची राखण करीत एक प्रकारचा सामाजिक संदेश या सदस्यांनी समाजाला दिला. सायकलिंगचा वापर हा व्यायामाच्या दृष्टीने पण चांगलाच आहे. लहान मुलांनी व तरुण पिढीने मोबाईलच्या जगातून बाहेर येऊन या सायकल चळवळीमध्ये सहभाग घ्यावा व आरोग्यकारक असे जीवन जगावे असे आवाहन यावेळी क्लबच्या सदस्यांकडून करण्यात आले.
या रॅलीमध्ये कनक रायडर्सचे मकरंद वायंगणकर, विष्णू रामा गडे, कैलास सावंत, संजय बिडये, यशवंत भोसले, संजय कुमार कदम, डॉ. आबदार पाटील, कौशिक पाटील, वैभव वाघाटे, रविंद्र सावंत, राधिका सावंत, प्रितिश सावंत, दिगंबर आढाव, गणेश शिरकर, निलेश गावकर, जगदीश अनगोळकर सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!