*कोंकण एक्सप्रेस*
*शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्याकडून मंत्री भरत शेठ गोगावले यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा*
*महाड ः प्रतिनिधी*
शिवसेनेचे महाराष्ट्र राज्याचे मंत्री (फलोत्पादन , रोजगार हमी योजना आणि खारभूमी विकास) मा. भरत शेठ गोगावले यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे राज्य उपनेते संजय वसंत आंग्रे यांनी महाड येथे भेटून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी संजय आंग्रे यांनी सांगितले की, “नेतृत्वात सौम्यपणा, कार्यशैलीत प्रामाणिकपणा आणि जनतेशी जोडलेलं नातं हीच भरत शेठ यांच्या यशस्वी वाटचालीची खरी ताकद आहे. विकासाच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करणाऱ्या अशा दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाला सदैव मनापासूनचा सन्मान आहे. त्यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!”
या भेटीदरम्यान स्थानिक शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनीही उत्स्फूर्तपणे आपुलकी व्यक्त केली.