*कोंकण एक्सप्रेस*
*स्व. विजयराव नाईक यांचा दहावा स्मृतिदिन साजरा*
*कणकवली : प्रतिनिधि*
स्व. विजयराव विष्णू नाईक यांचा दहावा स्मृतिदिन आज शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे साजरा करण्यात आला. यावेळी त्यांचे जेष्ठ सुपुत्र सतीश नाईक यांच्या हस्ते विजयभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार वैभव नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह नाईक कुटुंबीयांनी अभिवादन केले. विजयभाऊंनी समाजसेवेचा जो आदर्श घालून दिला आहे. त्यानुसार सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत राहून त्यांच्या कामाचा वारसा जोपासणार असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले.
त्याचबरोबर शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी कणकवली विजयभवन येथे विजयभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, संकेत नाईक, बेनी डिसोझा,बंटी खानोलकर, नंदिनी नाईक, राजवर्धन नाईक, युवक कल्याण संघाचे सचिव डॉ. रमण बाणे, खजिनदार प्रा. मंदार सावंत, उप प्राचार्य प्रा. श्री. उबाळे, प्रा. अमर कुलकर्णी, मेघा बाणे, मिलिंद आईर यांसह शिक्षक शिक्षकेत्तर कमर्चारी व विद्यार्थी उपस्थित होते.