*अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त प्रज्ञा परब यांचा सत्कार*

*अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त प्रज्ञा परब यांचा सत्कार*

*कोंकण एक्सप्रेस*

*अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त प्रज्ञा परब यांचा सत्कार*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त वेंगुर्ला भाजपाच्यावतीने विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहे. दरम्यान, महाराष्ट्र शासनाचा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त वेंगुर्ला येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा परब यांचा भाजपातर्फे जिल्हा उपाध्यक्ष अॅड.सुषमा प्रभूखानोलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रज्ञा परब यांनी गेली ३५ ते ४० वर्षे विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन बरेच पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे रहाण्यासाठी काथ्या कारखान्याची निर्मिती केली. त्या अहिल्यादेवी होळकर यांनी केलेल्या मानवतेच्या कामाचे अनुकरण करत कार्य करीत असल्याने त्यांचा भाजपातर्फे सत्कार करण्यात आला.

नेतृत्व, कर्तुत्व, दातृत्व आणि मातृत्व या चारही विषयात अहिल्यादेवी अलौकिक ठरल्या. त्या एक शुद्ध मनाच्या, सात्विक विचारांच्या आदर्श राज्यकर्त्या होत्या, असे प्रज्ञा परब यांनी स्पष्ट केले. सत्कारप्रसंगी भाजपाचे प्रसन्ना देसाई, पपू परब, मनवेल फर्नांडिस, सुजाता पडवळ, वृंदा गवंडळकर, वृंदा मोर्डेकर, रसिका मठकर, आकांक्षा परब, प्रणाली खानोलकर, समिधा कुडाळकर, हसिनाबेन मकानदार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!