*कोकण Express*
*फोंडाघाट मार्गे जिल्ह्या बाहेरील येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा सज्ज*
महाराष्ट्रराज्या तील शहरांमध्ये कोरोना ची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत असल्याने तसेच कोकणामध्ये शिमगा सणाच्या पार्श्वभूमीवर तसेच पर्यटना साठी येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमा वर तपासणी नाके उभारले असून त्याच प्रमाणे फोंडाघाट मार्गे जिल्ह्यात येणाऱ्या बाहेरील प्रवाशांची तपासणी करण्यासाठी पुन्हा आरोग्य यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा रोजचा वाढत आकडा चिंतेची बाब ठरत असून त्यामध्ये कोकणातील महत्वाचा सण शिमगा यासाठी मुंबई मधून मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपल्या गावी येत असतात त्यात सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने याठिकाणी वेगवेगळ्या भागातून पर्यटक हि मोठ्या प्रमाणत येत असल्याने आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात कोरोना ला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून राज्य सरकारने घालून दिलेले नियम कडकपणे पाळण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन हि तैनात करण्यात आले असून जिल्ह्याच्या सर्व सिमा भागांवर पुन्हा तपासणी नाके उभारले असून त्याच प्रमाणे फोंडाघाट हा सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा प्रमुख रस्ता असल्याने पुणे मार्गे जिल्ह्यात मुंबई वरून प्रवास करणारे प्रवासी किंवा पर्यटक याच मार्गाची जास्त निवड करत असल्याने शासनाने फोंडाघाट मार्गे बाहेरून येणाऱ्या वाहनातील प्रवासाची तपासणी करण्यास सुरुवात केली असून सध्या या नाक्यावर दोन पोलीस कर्मचारी तसेच आरोग्य विभागाचे तीन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.