*कोंकण एक्सप्रेस*
*नमसवाडी ब्राह्मण वर्धापनदिन ३१ रोजी*
*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*
उभादांडा-नमसवाडी येथील श्री देव ब्राह्मण मंदिराचा ५४वा वर्धापनदिन ३१ मे रोजी विविध कार्यक्रमांनी संपन्न होत आहे. यानिमित्त सकाळी लघुरुद्र, अभिषेक, श्रीसत्यनारायण महापूजा, दुपारी १ वा.महाप्रसाद, सायंकाळी भजन व रात्रौ ७.३० वा. पार्सेकर दशावतार मंडळाचा दणकेबाज नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ब्राह्मण प्रासादिक सेवा मंडळातर्फे केले आहे.