*कोंकण एक्सप्रेस*
*कसाल मध्ये वारंवार बीएसएनएल नेटवर्क खंडित*
*दोन दिवसात bsnl नेटवर्क सुरू झालं नाही तर उग्र आंदोलन : राजन परब*
*कसाल ः प्रतिनिधी*
कसाल मध्ये वारंवार बीएसएनएल नेटवर्क खंडित होत आहे याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार फोन करून सुद्धा त्याची दखल घेत नाहीत गेले वर्षभर हीच अवस्था बीएसएनएल नेटवर्कची आहे कसा ल मध्ये जे बीएसएनएल ऑफिस होते ते गेले कित्येक वर्षे बंद अवस्थेत आहे याबाबत सुद्धा स्थानिक ग्रामस्थांनी बीएसएनएल अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले होते परंतु आज पर्यंत कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही त्यामुळे भविष्यात कसाल गावा त किंवा परिसरात बी एस एन एल सिम कार्ड बंद होण्याच्या मार्गावर आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात येत आहे की या दोन दिवसात bsnl नेटवर्क सुरू झालं नाही तर उग्र आंदोलन बी एस एन एल ऑफिस कडे करण्यात येणार आहे असं माननीय सरपंच कसाल राजन परब यांनी सांगितलेले आहे