*विनापरवाना ठासणीची बंदूक बाळगल्याप्रकरणी सुधीर रमेश ठुकरुल याच्याविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल*

*विनापरवाना ठासणीची बंदूक बाळगल्याप्रकरणी सुधीर रमेश ठुकरुल याच्याविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल*

*कोंकण एक्सप्रेस*

*विनापरवाना ठासणीची बंदूक बाळगल्याप्रकरणी सुधीर रमेश ठुकरुल याच्याविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल*

देवगड / प्रतिनिधी

विनापरवाना ठासणीची बंदूक बाळगल्याप्रकरणी रहाटेश्वर कालवीवाडी येथील सुधीर रमेश ठुकरुल (४९) या संशयिताला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, सिंधुदुर्गच्या पथकाने पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी १.५० वा. च्या सुमारास करण्यात आली. याप – करणी संशयित सुधीर ठुकरुल याच्याविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, रामचंद्र शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जामसंडेकर, हवालदार प्रकाश कदम, अमर कांडर यांच्या पथकाने रहाटेश्वर कालवीवाडी येथे छापा टाकला असता तेथील रहाटेश्वर घोडेखिंड भागातील अशोक कदम यांच्या काजू बागेतील काजूच्या झाडाखाली पालापाचोळ्यामध्ये संशयित सुधीर ठुकरुल याने विनापरवाना लपवून ठेवलेली ठासणीची बंदूक आढळली. पथकाने ही बंदूक ताब्यात घेतली. संशयित सुधीर ठुकरुल हा अशोक कदम यांच्या बागेमध्ये देखभालीचे काम करतो. याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जामसंडेकर यांनी देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार संशयित सुधीर ठुकरुल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आशिष कदम करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!