*कलमठ ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष — ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी*

*कलमठ ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष — ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी*

*कोंकण एक्सप्रेस*

*कलमठ ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष — ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी*

*खोदकाम केलेल्या रस्त्यांची दुरुस्ती अद्याप नाही*

*विरोधी गटाचे ग्रामपंचायत सदस्य श्री धीरज मेस्त्री यांनी कलमठचे ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करूनही कामे अर्धवट*

*कलमठ (ता. कणकवली)*

कलमठ ग्रामपंचायतीच्या हद्दीत महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीमार्फत गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले असले तरी, खोदकामामुळे खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती अद्याप झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थ आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

दिनांक 25 मार्च 2025 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ग्रामपंचायत सदस्य श्री.धीरज श्रीधर मेस्त्री यांनी कलमठ ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे लेखी अर्जाद्वारे रस्ते दुरुस्तीची निवेदन केल होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. विरोधी गटाकडून सातत्याने मागणी केली जात असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष सुरूच आहे.

ग्रामस्थांच्या मते, रस्त्यांवर माती आणि दगड पसरल्यामुळे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी घरांसमोर चर पडले आहेत, त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचून अजूनच अडचणी निर्माण होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीने रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीकडे ३८ लाख ६९ हजार २५० रुपये जमा केले आहेत. मात्र, या निधीचा वापर करून दुरुस्तीची कामे अद्याप पूर्ण नाही.

गॅस पाइपलाइनचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते पुन्हा सुस्थितीत करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आणि ग्रामविकास अधिकारी कलमठ यांची आहे, असे स्पष्ट असूनही ही कामे प्रलंबित आहेत. पावसाळ्या मुळे रस्ते दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेण्यात यावे, अशी जोरदार मागणी ग्रामपंचायत सदस्य श्री.धीरज मेस्त्री यांनी केली आहे.

ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कलमठ आणि प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली असून, त्वरित कारवाई न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून
जनआंदोलन उभे करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!