*कणकवलीतील धनंजय कसवणकर बेपत्ता*

*कणकवलीतील धनंजय कसवणकर बेपत्ता*

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवलीतील धनंजय कसवणकर बेपत्ता*

*कणकवली – प्रतिनिधि*

शहरातील टेंबवाडी येथील धनंजय दिगंबर कसवणकर (५०) हे २५ मे रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून रहात्या घरातून बेपत्ता झाले असल्याची खबर त्यांची पत्नी शिवानी कसवणकर हिने पोलिसात दिली आहे.

अरोरा अल्टीस टोयोटा कार (नंबर एमएच ०७-४९८९) धुण्यासाठी घेऊन जातो असे सांगून घरातून बाहेर पडले ते अद्याप परतले नाही असे फिर्यादित म्हटले आहे. धनंजय कसवणकर यांची उंची ५ फुट ८ इंच असून वर्ण गोरा आहे. त्यांनी गडद निळ्या रंगाचा हाफ शर्ट व हिरव्या रंगाची ट्रॅक पॅन्ट घातली आहे. गळयात तुळशीची साधी माळ आहे. या वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास पोलिस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!