*कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहीती पत्रक वाटपाचा शुभारंभ*

*कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहीती पत्रक वाटपाचा शुभारंभ*

*कोंकण एक्सप्रेस*

*कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहीती पत्रक वाटपाचा शुभारंभ*

*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे कार्य ह्या माहीती पत्रकाच्या माध्यमातून घरोघरी पोहचवा — आम.निरंजन डावखरे .*

*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजपा च्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अहिल्यादेवींचे कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवीणे हा उद्देश आहे .
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अहिल्यादेवींच्या कार्यपुस्तीकेच्या वाटपाचा शुभारंभ आम.निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी मार्गदर्शन करताना आम.डावखरे म्हणाले कि मातृभुमीसाठी जीवन समर्पित करणाऱ्या विरांगणामध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव अग्रगण्य ठिकाणी येते . अखंड हिंदुस्थानला आपल्या कर्तृत्वाने प्रकाशित करणारी विरांगणा म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होय . कुठल्याही पदवीदान समारंभात न जाता लोकमाता , राजमाता ,वीरांगणा , पुण्यश्लोक , देवी , गंगाजल, निर्मळ मातोश्री या रयतेने अहिल्यादेवींना ह्रदयातुन दिलेल्या पदव्या तिनशे वर्षानंतरही टिकुन आहेत .अहिल्यादेवींचे धार्मिक जिवन समृद्ध होते .धर्मशील राजमातांच्या धर्माभिमानी कार्यामुळे त्यांना भारतीय मंदिराच्या प्रणेत्या म्हटले जाते . त्यांचे कार्य या पत्रकाच्या माध्यमातून भाजपा कार्यकरत्यांनी घरोघरी पोहचवावे असे आवाहन शुभारंभ प्रसंगी आम. निरंजन डावखरे यांनी केले .
सर्वप्रथम या अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी आम.निरंजन डावखरे यांना अहिल्यादेवींची प्रतिमा असलेले स्मृतीचिन्ह भेट दिले. यावेळी महीला जिल्हाध्यक्षा श्वेताताई कोरगावकर , जिल्हा सरचिटणीस महेश सारंग , मा.तालुकाध्यक्ष रविंद्र मडगांवकर व संदिप गावडे , सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर , आंबोली मंडल अध्यक्ष संतोष राऊळ , बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर , दोडामार्ग मंडल अध्यक्ष दिपक गवस , वेंगुर्ले मंडल अध्यक्ष पपु परब , महीला जि.सरचिटणीस सौ.शर्वाणी गावकर , मानसी धुरी , प्राजक्ता केळुसकर , सुजाता पडवळ , मिसबा शेख , दिपाली भालेकर , युवा मोर्चाचे पराशर सावंत, बाबा काणेकर , नगरसेवक आनंद नेवगी , सिद्धेश तेंडोलकर , अमित गवंडळकर , महेंद्र परब , सचिन गांवकर , जगंन्नाथ गांवकर , सरपंच देवेंद्र शेटकर , प्रमोद गावडे , उल्हास परब , कार्यालय प्रमुख दशरथ मांजरेकर उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!