सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा डॉ. मोहन दहिकरांनी पदभार स्वीकारला

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा डॉ. मोहन दहिकरांनी पदभार स्वीकारला

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा डॉ. मोहन दहिकरांनी पदभार स्वीकारला*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे अधीक्षकपदी बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक म्हणून ठाणे शहर पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले मोहन दहीकर यांची नियुक्ती झाली आहे.
गेली अडीच वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून सौरभ अग्रवाल यांनी उत्तम प्रकारे काम बजावले. आपल्या कार्यकाळात त्यांनी ग्रामीण जनतेच्या प्रश्नांसाठी विविध उपक्रम राबविले. शिवाय जिल्ह्यातील पोलिस भरती व अन्य विविध उपक्रमांमध्ये त्यांनी चांगले काम केले. जिल्ह्यातील अनेक गुन्हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली उघडकीस आले.
सन्माननीय डॉ. मोहन दहिकर साहेबांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात येत आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. पुणे येथे बदली झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक सन्माननीय श्री. सौरभकुमार अगरवाल यांनी डॉ. दहिकर साहेबाचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!