*कोंकण एक्सप्रेस*
*२१ ते २४ मे या कालावधीत सम्यक प्रबोधिनी मुंबई व गाव शाखेच्यावतीने मंडळाचा १३ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा*
*देवगड ः प्रतिनिधी*
-सम्यक प्रबोधिनी मुंबई व गाव शाखेच्यावतीने मंडळाचा १३ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमानी उत्साही आणि जल्लोषी वातावरणात संपन्न झाला. मुंबई आणि गाव शाखा पदाधिकारी, सभासद यांच्यामध्ये मंडळाचे ध्येय्यधोरण आणि वाटचालीबाबत संवाद सत्र कार्यक्रम पार पडला. सायंकाळच्या सत्रात खेळ पैठणीच्या कार्यक्रमात मुंबई व गाव शाखेच्या महिला वर्गाने सहभाग घेतला होता.
सकाळच्या सत्रात वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा व लहान मुलांसाठी फनी गेम्स स्पर्धा पार पडल्या. या विविध स्पर्धांमध्ये मुंबई व गाव शाखेतील मुला मुलीने सहभाग घेतला होता.तसेच कॅरम स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा, मेहंदी स्पर्धा व सायंकाळच्या सत्रात पाककला स्पर्धा पार पडली. या सर्व स्पर्धांमध्ये मुला-मुलींनी व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यातील विविध स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धांमध्ये विजेत्यांची नावे-वक्तृत्व स्पर्धा-प्रथम क्र. नुर्वी जाधव, द्वितीय क्र. आर्या मणचेकर, तृतीय क्र. नुपूर जाधव. निबंध स्पर्धा-आर्या मणचेकर, श्रुती जाधव. प्रश्नमंजुषा स्पर्धा-शालेय गट-प्रथम क्र. आर्या मणचेकर, द्वितीय क्रमांक विभागून-वैभव जाधव, नुर्वी जाधव. प्रश्नमंजुषा खुला गट-प्रथम क्र. सिद्धेश जाधव, द्वितीय क्र. अजय जाधव. लहान मुलांसाठी संगीत खुर्ची-प्रथम क्र. बोधीराज जाधव, द्वितीय क्र. ईशान जाधव. विविध फनी गेम्स स्पर्धा-लहान मुले प्रथम क्र. सनवेद राठोड, द्वितीय क्रमांक विभागून सम्यक जामसंडेकर, ईशान जाधव. मुलींचे विविध फनी गेम्स स्पर्धा-प्रथम क्र. प्रज्ञा जाधव, द्वितीय क्र. सायना जाधव. मेहंदी स्पर्धा-प्रथम क्र. श्वेता जाधव, द्वितीय क्र. नुपूर जाधव, तृतीय क्र. सौ. कियारा जाधव. कॅरम स्पर्धा -लहान गट प्रथम क्र. वैभव जाधव, द्वितीय क्र. स्वानंद जाधव. कॅरम स्पर्धा – मोठा गट प्रथम क्र. परेश जाधव, द्वितीय क्र. विनेश जाधव. पाककला स्पर्धा-प्रथम क्र. सौ. कियारा जाधव, द्वितीय क्र. विभागून सौ. प्रचिता जाधव, मनिषा मोहन जामसंडेकर. खेळ पैठणीचा-प्रथम विजेती मानकरी-प्रियांका जाधव व उपविजेती अश्रीता जाधव मानकरी ठरली.
प्रश्नमंजुषा, संगीत खुर्ची, विविध फनी गेम्स स्पर्धांचे निवेदन दीपक जामसंडेकर,परेश जाधव, प्रकाश गणपत जाधव यांनी आपल्या खुमासदार भाषाशैलीत सादरीकरण केल्याने कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली होती. वर्धापन दिन कार्यक्रमाला मुंबईचे पदाधिकारी सतीश जामसंडेकर, दीपक विजय जामसंडेकर, परेश रमेश जाधव, अजय देऊ जाधव, अरुण दामोदर जाधव, शिरीष दामोदर जाधव यांची लक्षणीय उपस्थिती लाभले होती. तीन दिवसीय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंबईच्या पदाधिकाऱ्यांसह गाव शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, महिलावर्ग, बाल बालिका, युवा वर्ग यानी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. तीन दिवसीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव राजेंद्र जाधव यांनी केले. शेवटच्या दिवशी मंडळाचे उपाध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या आभार प्रदर्शन भाषणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. दि.२४ मे रोजी रात्री स्नेहभोजनाचा आस्वाद घेताना १४ चौदाव्या वर्धापन दिनाच्या प्रतीक्षेत खऱ्या अर्थाने कार्यक्रमाची सांगता झाली.