विद्यातपस्वी चिंतामणी तोरसकर स्वप्नपूर्ती पॅनल बहूमताने विजयी

विद्यातपस्वी चिंतामणी तोरसकर स्वप्नपूर्ती पॅनल बहूमताने विजयी

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यातपस्वी चिंतामणी तोरसकर स्वप्नपूर्ती पॅनल बहूमताने विजयी*

*अध्यक्ष म्हणून श्री.रविकिरण चिंतामणी तोरसकर आणि उपाध्यक्ष म्हणून श्री.निशांत चिंतामणी तोरसकर यांची निवड*

**देवगड ः प्रतिनिधी*

कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळ कोलगाव,सिंधुदुर्ग हि संस्था शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून संस्थापक म्हणून कै. चिंतामणी तोरसकर यांचा या संस्थेच्या वाटचालीत मोठं योगदान आहे. त्यांच्या पश्चात त्यांची स्वप्नपूर्ती व्हावी या दृष्टीकोनातून संस्थेतील विविध घटकातील सभासदांनी कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकत्र येऊन विद्यातपस्वी चिंतामणी तोरसकर स्वप्नपूर्ती पॅनल सदर निवडनूकीस उभे केले होते. यामध्ये अध्यक्ष श्री. रविकिरण तोरसकर, उपाध्यक्ष श्री. निशांत तोरसकर, सचिव सौ. पूनम नाईक, सहसचिव डॉ.ज्योती रविकिरण तोरसकर ,खजिनदार श्री. हेमंत वालकर, कार्यकारीनी सदस्य श्रीम. संगीता तोरसकर, सौ. अलका नारकर, श्री.देवेंद्र राऊळ, श्री.मनोज सातार्डेकर, श्री.दयानंद सराफ, श्री.प्रवीण आचरेकर श्री.गणेश आरोंदेकर, श्री.नितीन सावंत, सौ.चित्रलेखा हिंदळेकर, श्री.प्रसन्ना राठोड असे सर्व पंधरा सदस्य बहुमताने निवडून आले. काल दिनांक २५/०५/२०२५ रोजी संस्थेची निवडणूक कोलगाव माध्यमिक विद्यालय पार पडली. धर्मदाय आयुक्त कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या देखरेखी खाली सदरची निवडणूक पार पडली. विजयी उमेदवार यांना संस्थेचे आजीव सभासद डॉक्टर विवेक रेडकर व सर्व सभासदांनी तसेच धर्मदाय आयुक्त कार्यालय कर्मचारी यांनी शुभेच्छा देऊन शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य विषयक विषयात संस्था मजबुतीने काम करेल असा आशावाद व्यक्त केला.
*श्रीमती.रविकिरण चिंतामणी तोरसकर*
9422633518
9373958726

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!