कविलकाटे-बाव परिसरात माळरानावर डुक्कराला लावलेला फसकीचा शॉक लागून पिता- पुत्राचा जागीच ठार.

कविलकाटे-बाव परिसरात माळरानावर डुक्कराला लावलेला फसकीचा शॉक लागून पिता- पुत्राचा जागीच ठार.

*कोकण Express*

*कविलकाटे-बाव परिसरात माळरानावर डुक्कराला लावलेला फसकीचा शॉक लागून पिता- पुत्राचा जागीच ठार…*

*नजीकच्या शेतात कणीस काढायला व्यक्तीही या वायरचा शॉक लागून गंभीर जखमी….*

*कुडाळ ः प्रतिनिधी* 

कुडाळतालुक्यातील कविलकाटे-बाव परिसरात डुक्कराला लावलेल्या विजेच्या फासकीचा शॉक लागून कुडाळ येथे पिता-पुत्र जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.ही घटना आज सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर माहिती, कुडाळ तालुक्यातील कविलकाटे-बाव परिसरात माळरानावर डुक्कराला लावलेला फसकीचा शॉक लागून वडील दीपक मातोंडकर, मुलगा भगवान मातोंडकर यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच अन्य एक जण नजीकच्या शेतात कणीस काढायला आला त्यालाही त्या वायरचा शॉक लागून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.
वडील दिपक यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगा भगवान यांच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगा असा परिवार आहे.याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास पोलिस यंत्रणेकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!