*कोंकण एक्सप्रेस*
*राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्या निमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा रत्नागिरीच्या वतीने युवा प्रेरणा संवाद कार्यक्रम संपन्न*
*रत्नागिरी*
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्या निमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा उत्तर व दक्षिण च्या वतीने युवा प्रेरणा संवाद कार्यक्रम 25 मे 2025 रोजी चिपळुण येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन मा. आम. प्रमोदजी जठार साहेब यांनी मार्गदर्शन केले.
ते म्हणाले संपूर्ण हिंदूस्थान भर भगवान शंकरांची मंदिरे बांधून देश धार्मिक नं सांस्कृतिक परंपरेने एकसंध करणारी , छत्रपती शिवरायां नंतर सलग २९/३० वर्षे प्रजेची मातेच्या ममतेने काळजी घेणारी , प्रजा – राज्य संरक्षण व हीत दक्ष , कर्तव्य कठोर , नवीन कायदे , , रस्ते , धर्मशाळा, घाट बांधणारी , करप्रणाली सुरु करणारी उत्कृष्ट प्रशासक , परकीय आक्रमकांच्या खुणा पुसुन टाकणारी राणी, महाराणी असुनही तिचा संवेदनशील राज्यकारभार बघून जनतेने देवी , पुण्यश्लोक , मातोश्री या उपाधी बहाल केलेली धनगर समाजातील एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेली एक महिला , तिचं तसेच हजारो वर्षे भारत हे एक महान , अखंड , विकसित हिंदू राष्ट्र निर्माण व्हावे म्हणुन काम केलेल्या महापुरुष व महिलांचे स्मरण म्हणजेच आपल्या पुर्वज्यांच्या पराक्रमाचे स्मरण आणी ते करणे हीच भारतीय जनता पार्टी ची परंपरा व इतर पक्षांपेक्षा असलेले निराळेपण , वैशिष्ट्य ते जपण्याचे काम भाजपचे कार्यकर्ते म्हणुन करावे ……..कार्यक्रमांमध्ये अहिल्यादेवीं ची वेशभुषा करण्यात आली होती. त्याच बरोबर युवा प्रेरणा संवाद तसेच युवती प्रेरणा सन्माण सोहळा असा विषेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, शहर अध्यक्ष शशिकांत मोदी, युवा मोर्चा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर, युवा मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अतुल गोंदकर मा. रामदासजी राणे, वसंत ताम्हणकर, प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई चव्हाण आणि पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.