*कोंकण एक्सप्रेस*
*मालवण तालुका बौद्ध सेवा समिती मुंबई यांच्या वतीने भगवान गौतम बुद्ध आणि बोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती 25 मे रोजी मालवण येथे होणार साजरी*
*मालवण ः प्रतिनिधी*
मालवण तालुका बौद्ध सेवा समिती मुंबई आणि मुलखी शाखा यांच्या वतीने भगवान गौतम बुद्ध आणि बोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उद्या रविवार दिनांक 25 मे रोजी सकाळी दहा वाजता मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे होणार आहे
या जयंतीच्या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून शिवराज्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रोशन पाटील हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मालवण तालुका बौद्ध सेवा समिती मुंबईचे अध्यक्ष सत्यविजय तांबे मालवण तालुका बौद्ध सेवा समिती मुंबई मुलखी शाखा अध्यक्ष राजेंद्र कदम हे उपस्थित राहणार आहेत तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ऍड आनंद कासले अशोक कदम, संदीप कदम, आनंद तांबे, अनिल किर्लोस्कर हे उपस्थित राहणार आहेत
दुपारच्या सत्रात दुपारी साडेतीन वाजता रवींद्र कलाविष्कार थिएटर्स निर्मिती विजयस्तंभ हे दोन अंकी नाटक सादर केले जाणार आहे या कार्यक्रमात मान्यवरांना जीवन गौरव पुरस्कार तसेच सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून इयत्ता दहावी, बारावी, पदवी, स्कॉलरशिप परीक्षेत यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष सत्यविजय तांबे आणि मुलखी शाखा अध्यक्ष राजेंद्र कदम यांनी केले आहे