*अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा*

*अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा*

*कोंकण एक्सप्रेस*

*अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा*

*वेंगुर्ला प्रतिनिधी -प्रथमेश गुरव*

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर एक आदर्श शासिका आणि जनसेविका म्हणून ओळखल्या जातात. यंदाचे हे त्यांचे ३००वे जन्मवर्ष आहे. त्यांचे विचार तरूणांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने वेंगुर्ला भाजपातर्फे अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित वेंगुर्ला तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.

स्पर्धकाने ‘अहिल्याबाई होळकर ः एक आदर्श शासिका आणि जनसेविका‘ किवा ‘शौर्य, सेवा आणि श्रद्धेचा संगम ः अहिल्याबाई होळकर‘ यापैकी एका विषयावर ७०० ते १००० शब्दांमध्ये निबंध लिहून तो पोस्टाने किवा प्रत्यक्ष भाजपाच्या वेंगुर्ला कार्यालयात आणून द्यावयाचा आहे. स्पर्धेतील प्रथम दोन विजेत्यांना १ हजार व ५०० तसेच चषक आणि प्रमाणत्र देण्यात येईल. तसेच या दोन्ही विजेत्यांचे निबंध हे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पाठविले जाणार आहेत. जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेत्यांसाठी अनुक्रमे २०२५ व १७२५ अशी रोख बक्षिसे तसेच चषक ठेवण्यात आले आहेत. वेंगुर्ला तालुकास्तरीय स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी सई चेंदवणकर (७७१९९८३०६३)यांच्याशी संफ साधावा, असे आवाहन तालुकाध्यक्ष पपू परब यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!