*कोंकण एक्सप्रेस*
*ऑरेंज अलर्टमुळे स्वच्छ वेंगुर्ला दौडमध्ये बदल*
*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त २५ मे रोजी ‘स्वच्छ वेंगुर्ला दौड‘ आयोजित केली होती. परंतु, ऑरेंज अलर्ट असल्यामुळे यात बदल करण्यात आला असून संबंधित दौड ही जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गुरूवार दि.५ जून रोजी घेण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन ५ जून रोजी दौडसाठी उपस्थित रहावे असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे.