*कोकण Express*
*खारेपाटण चेकपोस्टवर दोन दिवसांत 180 हून अधिकांची तपासणी*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा सीमा प्रवेशद्वार खारेपाटण चेकपोस्टवर कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाश्यांची तपासणी शुक्रवार 26 मार्च पासून आरोग्य विभागाच्या पथकाकडून करण्यात येत आहे. यासाठी विशेष आरोग्य पथक तैनात करून आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसात खारेपाटण चेकपोस्ट वर जवळपास 182 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. शिमगोत्सव ,होळी सण आल्याने दरवर्षीप्रमाणे मुंबईकर चाकरमानी किंवा परजिल्ह्यातून लोकं आपल्या गावी येत असतात.त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या हेतूने सिंधुदुर्ग जिल्हा सीमा प्रवेशद्वार खारेपाटण येथे नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे.
दरम्यान खारेपाटण चेकपोस्ट येथे दिनांक 26/3/2021 पासुन ते दिनांक 31/3/2021 पर्यंत आरोग्य पथक सकाळी 8 ते 2 व दु 2 ते रात्री 8 वाजेपर्यंत दोन सत्रात ठेवण्यात आले असून या आरोग्य पथकात CHO डॉ.प्रणव पाटील,डॉ.प्रशांत कानदे,CHOडॉ.धनश्री जाधव,CHOडॉ. तेजस्वी पारकर ,आरोग्य सेवक सागर खोत,गणेश तेली हे अधिकारी व कर्मचारी काम करत असून पोलीस यंत्रणेकडून ही वाहनांची तपासणी होत आहे.
वाहनांची तपासणी करणे, कोणाला सर्दी ताप खोकला किंवा कोरोना संसर्गाची प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास त्या व्यक्तीला जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करणे.सदर व्यक्ती कंटेन्मेंट झोन किंवा हॉटस्पॉट भागातून आली आहे का याची माहिती घेणे, ट्रॅव्हल हिस्ट्री चेक करणे, थर्मल गन, ऑक्सिमिटर द्वारे स्क्रिनिंग केले जात आहे.