*श्री रामसीतेच्या मूर्तीची पुनःप्राणप्रतिष्ठापना संपन्न*

*श्री रामसीतेच्या मूर्तीची पुनःप्राणप्रतिष्ठापना संपन्न*

*कोंकण एक्सप्रेस*

*श्री रामसीतेच्या मूर्तीची पुनःप्राणप्रतिष्ठापना संपन्न*

*वेंगुर्ला प्रतिनिधी  : प्रथमेश गुरव*

येथील प्रसिद्ध श्री रामेश्वर मंदिरात नूतन बांधण्यात आलेल्या श्री राम मंदिरात शुक्रवारी श्री रामसीतेच्या मूर्तीची पुनःप्राणप्रतिष्ठापना तसेच कलशारोहण करण्यात आले.

वेंगुर्ला येथील श्री देव रामेश्वर मंदिर परिसर सुशोभिकरण कार्याअंतर्गत श्री रामेश्वराच्या कौलप्रसादाप्रमाणे नवीन मंदिरात श्री रामसीता देवतांच्या मूर्तींची पुनःप्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम २२ व २३ मे रोजी आयोजित करण्यात आला हता. दि. २२ रोजी गणेश पूजन आणि पुण्याहवाचनासह धार्मिक विधी करण्यात आले. तर दि. २३ ते रोजी देवस्थान मानकरी यांच्या हस्ते तसेच देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी आणि भाविकांच्या उपस्थितीत नूतन बांधण्यात आलेल्या मंदिरावर शिखर कलशारोहण करण्यात आले. त्यानंतर मंदिरात श्रीराम सीता यांची पुनःप्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनी श्रीरामाचा जयजयकार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!