*कोंकण एक्सप्रेस*
*कुडाळ मधील क्रीडांगणाचा नव्याने आराखडा तयार करा*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
कुडाळ मधील क्रीडांगणाचा नव्याने आराखडा तयार करण्याच्या सूचना आमदार निलेश राणे यांनी क्रीडा विभागाला दिल्या आहेत. या आराखड्यात अत्याधुनिक क्रीडांगण आणि त्यामध्ये असणाऱ्या सुविधा समाविष्ट करण्याचेही निर्देश त्यांनी दिले आहेत.
कुडाळ तालुका क्रीडा विभागाची बैठक तहसीलदार कार्यालय येथे आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कार्याध्यक्ष तहसीलदार वीरसिंग वसावे, सचिव तथा क्रीडा अधिकारी शिंदे, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, नगरपंचायत मुख्याधिकारी अरविंद नातू, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाटील तसेच जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, काका कुडाळकर, बाबा परब, दादा साईल आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये आमदार निलेश राणे यांनी आढावा घेऊन शहरामध्ये असलेले क्रीडांगण कशा प्रकारे विकसित करता येईल यावर लक्ष वेधले. या क्रीडांगणासाठी तीन कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि मंजूर झालेल्या निधीचा विनियोग चांगला झाला पाहिजे त्यासाठी नव्याने प्लॅन तयार करा आणि मला दाखवा. या प्लॅनमध्ये आधुनिक पद्धतीचे क्रीडांगण व त्यामधील सुविधा असल्या पाहिजे हे लक्षात ठेवा अशा सूचना क्रीडा अधिकारी शिंदे यांना दिल्या