वैभववाडीत दिवसभर मुसळधार पाऊस : भुईबावडा घाटात कोसळली दरड

वैभववाडीत दिवसभर मुसळधार पाऊस : भुईबावडा घाटात कोसळली दरड

*कोंकण एक्सप्रेस*

*वैभववाडीत दिवसभर मुसळधार पाऊस : भुईबावडा घाटात कोसळली दरड*

करुळ घाटातही ठिकठिकाणी पडझड वाहतूक धिम्या गतीने सुरू*

*वैभववाडी। प्रतिनिधी*

अवकाळी पावसाचा फटका करूळ व भुईबावडा घाटमार्गाला बसला आहे. भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर करूळ घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. करूळ घाटातून सद्यस्थितीत धिम्या गतीने वाहतूक सुरू आहे. वैभववाडी तालुक्यात गुरुवारी दिवसभर पडणाऱ्या मुसळधार पावसाने अक्षरशा झोडपून काढले. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गेले चार दिवस सह्याद्री पट्ट्‌यासह तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. या अवकाळी पावसाचा सर्वानाच फटका बसला आहे. तालुक्यातील भुईबावडा घाटात दरड कोसळली आहे. नवीनच बांधण्यात आलेल्या वैभववाडी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाटातील ठिकठिकाणी किरकोळ प्रमाणात दगडी पडण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र संबंधित ठेकेदाराने दरडी हटवण्यासाठी जेसीबी आणि कामगारांची टीम तयार ठेवली आहे. त्यामुळे त्याचा वाहतुकीवर कोणता परिणाम झालेला नाही. भुईबावडा घाटात कोसळलेली दरड सार्वजनिक बांधकामच्या अधिकारी कर्मचारी यांनी घाटात जाऊन जेसीबीच्या सहाय्याने बाजूला केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!