बांधकाम कामगारांना गृहपयोगी भांडी संच वाटपाचा कार्यक्रम जाहीर

बांधकाम कामगारांना गृहपयोगी भांडी संच वाटपाचा कार्यक्रम जाहीर

*कोंकण एक्सप्रेस*

*बांधकाम कामगारांना गृहपयोगी भांडी संच वाटपाचा कार्यक्रम जाहीर*

*सिंधुदुर्ग*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना गृहपयोगी भांडी संच वाटप करणेबाबत सहाय्यक कामगार आयुक्त, रत्नागिरी यांच्या सूचनेनुसार व भारतीय मजदूर संघाच्या पदाधिका-यांशी झालेल्या चर्चेनंतर वाटप कार्यक्रम जाहीर झाला असून, ज्या नोंदीत बांधकाम कामगारांना यापूर्वी गृहउपयोगी भांडी संच किट मिळालेले नाही आणि नोंदणी जीवित आहे. अश्या नोंदणी जीवीत असलेल्या बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप करण्यात येणार आहे. यानुसार देवगड तालुका दिनांक २२, २३, २४ मे २०२५ ठीकाण देवगड खरेदी विक्री संघ, कुडाळ तालुका २२, २३, २४ मे २०२५ कुडाळ महालक्ष्मी हॉल गुलमोहर हॉटेल समोर, सावंतवाडी व दोडामार्ग तालुका दिनांक २५ मे व २७ मे २०२५ सावंतवाडी शहाबुद्दीन हॉल बस स्टेंट समोर, मालवण तालुका दिनांक २८, २९, ३० मे २०२५ मालवण मामा वरेरकर नाट्यगृह हॉल, वेंगुर्ले तालुका दिनांक ३१ मे व १ जून २०२५ वेंगुर्ले नगर परिषद हॉल, कणकवली व वैभववाडी तालुका दिनांक ३, ४, ५, ६ जून २०२५ कणकवली नगर पंचायत हॉल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना आवाहन करण्यात येते की, सदर वस्तू रुपी भांडी संच त्या त्या तालूक्याती कामगारांनी आपल्याच ठरलेल्या तालूका ठीकाणी घ्यावे. तसेच गृहपयोगी भांडी संच हे महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम मंडळाकडून पूर्णतः मोफत मिळणार आहे. यासाठी कोणाही व्यक्तीला, एजंटाला अगर संघटनेला पैसे देण्याची गरज नाही. कोणाही व्यक्तीने किंवा एजंटाने भांडी संच किट मिळवून देण्यासाठी किंवा भांडी संच हमीपत्र फार्मसाठी पैशाची मागणी केल्यास, तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन बांधकाम कामगार महासंघ जिल्हाध्यक्ष श्री भगवान साटम यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!