*कोंकण एक्सप्रेस*
*ऑपरेशन सिंदूर च्या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर तळेरे येथे भव्य तिरंगा रॅली संपन्न*
*कणकवली ः प्रतिनिधी *
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेल्या भ्याड हल्ल्याच्या उत्तरादाखल ऑपरेशन सिंदूरने मिळवलेल्या विजयाच्या सन्मानार्थ तसेच या विजयासाठी प्राण तळहातावर घेऊन लढणाऱ्या त्रिदलातील, विशेषतः वायुदलातील सैनिकांना प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी, युद्धात स्वतःचे प्राण समर्पण करून अमर झालेल्या वीरांप्रति आणि पहलगाम हल्ल्यात भारतीय म्हणून प्राण गमावलेले पर्यटक या सर्वप्रथम कृतज्ञता अभिव्यक्त करण्यासाठी तळेरे येथे ही तिरंगा मेळयात्रा काढण्यात आली. स्वतःचा प्राण तळहातावर घेऊन शत्रूशी लढणाऱ्या तसेच वीरगती प्राप्त करणाऱ्या, देशातील नागरिकांना शत्रूपासून सुरक्षा आणि अभय देऊन सुखाचे घास खाऊ देणाऱ्या त्रिदलातील सैनिकांप्रति कृतज्ञता अभिव्यक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या शौर्यकर्तृत्वाला प्रेरणा देण्यासाठी आणि पाकिस्तानवरील भारताच्या विजयाचा सन्मान करण्यासाठी भव्यदिव्य तिरंगा रॅलीचे तळेरे येथे आयोजन करण्यात आले होते.