*राज्यमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी निमित भाजपा सिंधुदुर्गची जिल्हा कार्यशाळा संपन्न*

*राज्यमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी निमित भाजपा सिंधुदुर्गची जिल्हा कार्यशाळा संपन्न*

*कोंकण एक्सप्रेस*

*राज्यमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी निमित भाजपा सिंधुदुर्गची जिल्हा कार्यशाळा संपन्न*

*सिंधुदुर्ग नगरी*

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती कार्यक्रम दि.21 मे ते 31 मे या कालावधीत भारतीय जनता पार्टी आयोजित करीत आहे. यानिमित्ताने जिल्हा कार्यशाळा आज २१ मे २०२५ रोजी, ११ वाजता, वसंत स्मृती ओरोस येथे संपन्न झाली.
या कार्यशाळेसाठी गड किल्ले, इतिहास अभ्यासक सौ. ज्योती तोरस्कर यांनी अहिल्यादेवींच्या चरित्रावर प्रकाश टाकला आणि उपस्थितांना त्यांच्या कार्याची माहिती दिली.
भाजपा महीला प्रदेश उपाध्यक्षा व अभियानाच्या प्रदेश सहसंयोजक प्रा.वर्षाताई भोसले यांनी अहिल्यादेवींची कार्यपद्धती आणि आत्ताचे देशातील आणि राज्यातील सरकार यांच्या कार्याची तुलना करत भारतीय जनता पार्टी ही अशाच थोर विचारांवर , सिद्धांतावर काम करत असलेचे नमूद करत हे विचार जनतेत पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्तेंवर सोपवली.
या प्रसंगी या अभियानाचे संयोजक प्रसन्ना देसाई यांनी सर्वांचे स्वागत केले आणि या अभियानाची माहिती दिली. अभियानाच्या कोकण विभाग संयोजक वर्षा भोसले यांनी प्रतीमा पुजन केले. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि संघटन मंत्री शैलेंद्र दळवी यांनी या अभियानाचे महत्व सांगितले. या प्रसंगी महीला मोर्चा प्रदेश चिटनीस शिल्पा मराठे , महीला मोर्चा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर , प्रदेश का.का.सदस्य संध्या तेरसे , जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई व संदिप साटम , सोशल मिडीयाचे जिल्हा संयोजक श्रीकृष्ण उर्फ राजु परब , किसान मोर्चा जि.संयोजक उमेश सावंत , अनुसूचित जाती जिल्हा संयोजक नामदेव जाधव , दिव्यांग आघाडी जि.संयोजक अनिल शिंगाडे , भटक्या विमुक्त जाती प्रदेश उपाध्यक्ष शांताराम गोसावी तसेच जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष , मंडल अभियान समिती सदस्य , मोर्चा / आघाडी / प्रकोष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यशाळेचे आभार प्रदर्शन भटके विमुक्त आघाडी चे जिल्हा संयोजक नवलराज काळे यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!