*कोकण Express*
*सिंधुरत्न लोककला मंच आयोजित एकदिवसीय कार्यशाळा सम्पन्न*
*“तळागाळातील उपेक्षित कलाकारांच्या कला गुणांना वाव देणार ”*
*प्रकाश आजविलकर*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
“कोकणातील तळागाळातील उपेक्षित नवं तरुण कलाकारांना एकत्र करून त्यांच्या कला गुणांना वाव देऊन भविष्यातील उत्कृष्ठ कलाकार घडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भावपूर्ण उदगार सिंधुरत्न लोककला मंच आयोजित एकदिवसीय कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी या संघटनेचे मुंबई अध्यक्ष श्री प्रकाश आजविलकर यांनी काढले.”
सिंधुरत्न लोककला मंच मुंबई/ग्रामीण या संघटनेच्या वतीने बुरबावडे ता.देवगड येथील “पंचशील बुद्धविहार” येथे नुकतीच एकदिवसीय कार्यशाळा संघटनेचे मुंबई शाखेचे अध्यक्ष प्रकाश आजविलकर यांच्या अध्यक्षतेखाली सम्पन्न झाली . या कार्यक्रमाला बुरबावडे गावचे सरपंच श्री रवींद्र शिंगे,सिंधुरत्न कलमांचाचे ग्रामीण शाखेचे अध्यक्ष जनीकुमार कांबळे,उपाध्यक्ष प्रभाकर पोमेडकर,अमृत जंगम ,बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण चे अद्यक्ष मोहन पगारे,चिटणीस मंगेश कांबळे,वैभववाडी तालुका बौद्धजन सेवा संघाचे चिटणीस रवींद्र पवार,पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर,राजेश कांबळे,सी पी कांबळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
तसेच या एकदिवसीय कार्यशाळेला संगीत तज्ञ श्री.अंकुश सांगेलकर (सावंतवाडी), संगीत विषारद संदीप पेंडूरकर (मालवण),ए. पी.कदम,राहुल कदम,गणेश तुळसकर ,नाट्य दिग्दर्शक एस आर कांबळे यांनी विशेष मार्गदर्शन केले.यावेळी सिंधुरत्न कलामंच च्या वतीने मुंबईअध्यक्ष – प्रकाश आजविलकर,ग्रामीण अध्यक्ष – जनीकुमार कांबळे,श्रीपत कुसुरकर,प्रभाकर पोमेडकर यांच्या शुभहस्ते उपस्थित मान्यवर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यशाळेत सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथून नवतरुण गायक कलाकार आपली कला सादर करण्यासाठी बुरबावडे ता.देवगड “पंचशील बुद्धविहार ” येथे उपस्थित होते.
सदर कार्यशाळेत संकेत कांबळे -(कोळपे,वैभववाडी),संजय पवार (दोनिवडे,राजापूर)कुणाल पाटणकर(खारेपाटण,कणकवली) राजेश सावंत (बुरंबावडे,देवगड), सागर पोमेडकर(खारेपाटण) या शिबिरार्थी कलाकारांनी आपली कला सादर केली. तर या कार्यशाळेत संगीत विशारद शिक्षक श्री पेंडूरकर सर यांनी “गायन कलेला आवश्यक रियाज ” या विषयावर मार्गदर्शन केले.तर तसेच संगीत तज्ञ अंकुश सांगेलकर यांनी “गायन क्षेत्रातील नावनविन संधी ” या विषयावर मार्गदर्शन केले.तसेच दिनेश तुळसकर यांनी ताल लय आणि संगीत या विषयावर मार्गदर्शन केले.
दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत एकूण 25 च्या वर गायन व वादन कला संगीत क्षेत्रातील आवड असणाऱ्या नवं कलाकारांनी सहभाग घेतला होता.या कार्यशाळेचे सूत्रसंचालन सिंधुरत्न लोककला मंच चे कार्यकर्ते श्री श्रीपत कुसुरकर यांनी केले.तर सर्वांचे आभार कवी गायक जनीकुमार कांबळे यांनी मानले.