*कोंकण एक्सप्रेस*
*कनेडी हायस्कूलच्या पाच विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयात 100 गुण मिळवून घडविला इतिहास*
*माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी /मार्च २०२५ मध्ये कनेडी हायस्कूलच्या ५ विद्यार्थ्यांना संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण*
*कणकवली : प्रतिनिधि*
नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी/मार्च २०२५ च्या निकालामध्ये कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी या प्रशालेने आपली १००% निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली. या निकालातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे संस्कृत विषयामध्ये ५ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण प्राप्त करत प्रशालेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. दरवर्षी २-३ विद्यार्थी संस्कृत विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवतात. या वर्षी मात्र ५ विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवत इतिहास रचला. काही तांत्रिक कारणांमुळे प्रशालेतील केवळ १८ विद्यार्थ्यांनीचं संस्कृत संपूर्ण हा विषय निवडला होता आणि त्यातील ५ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण प्राप्त केले हे विशेष उल्लेखनीय आहे.
संस्कृत विषयात प्रशालेतील १०० पेकी १०० गुण प्राप्त केलेले विद्यार्थी खालीलप्रमाणे –
१) कु. कृपा कैलास सावंत (एकूण टक्केवारी- ९५.२०)
२) कु. तन्वी प्रसाद हर्णे (एकूण टक्केवारी- ९४.८०)
३) कु. मैत्रेयी मकरंद आपटे (एकूण टक्केवारी- ९३.४०)
४) कु. तन्वी प्रकाश सावंत ( एकूण टक्केवारी- ९२.८०)
५) कु. श्रेया राजेंद्र महाडीक (एकूण टक्केवारी- ८९.४०)
संस्कृत विषयात पैकीच्या पैकी गुण प्राप्त केल्या मुळे या सर्व विद्यार्थ्यांना केंद्र सरकार पुरस्कृत संस्कृत शिष्यवृत्ती (इ. ११वी व १२वी दरवर्षी रु. ५०००/- ) सुद्धा प्राप्त होणार आहे. संस्कृत सारख्या अत्यंत प्राचीन भाषेत विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश निश्चितचं कौतुकास्पद आहे. तसेच कनेडी सारख्या ग्रामीण भागात कोणत्याही क्लास शिवाय मिळविलेले हे यश विशेषचं म्हणावे लागेल. यापूर्वी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२० मध्ये याचं प्रशालेतील ६ विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त करण्याची किमया केलेली होती. गेल्याचं वर्षी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १२वी) मध्ये याचं प्रशालेचा विद्यार्थी श्रीराम बाक्रे हा संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त करत संपूर्ण राज्यामध्ये पहिला आला होता.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे अध्यक्ष मा. श्री. सतीश सावंत, उपाध्यक्ष मा. श्री. पी. डी. सावंत, सरचिटणीस मा. श्री. शिवाजी सावंत, खजिनदार मा.श्री. प्रकाश सावंत व सर्व संचालक, शालेय समिती चेअरमन मा. श्री. आर्. एच्. सावंत, खजिनदार श्री. गणपत सावंत व सर्व सदस्य, प्रशाला मुख्याध्यापक तथा प्राचार्य मा. श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक मा. श्री. बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे संस्कृत विषय शिक्षक श्री. मकरंद आपटे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.