*कोंकण एक्सप्रेस*
*आडेलीत जीवे मारण्याचा प्रयत्न, आरोपीस १५ दिवसांची कोठडी*
*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*
काकी व चुलत बहिणीस जीवंत मारण्याचा प्रयत्न करणा-या बाळकृष्ण कुबल याला मंगळवारी कुडाळ न्यायालयात हजर केले असता त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठवण्यात आली आहे.
आडेली-गावठाणवाडी येथे सामाईक जमिनीच्या वादातून सख्ख्या पुतण्याने काकी व तेरा वर्षांची चुलत बहीण झोपडीत झोपलेली असताना झोपडीला आग लावून दोघांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी संजना सत्यवान कुबल (४२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी बाळकृष्ण विजय कुबल (२७, रा. आडेली-गावठाणवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आगीत संजना कुबल यांची झोपडी व आतील सामान जळून मोठे नुकसान झाले होते. या प्रकरणी वेंगुर्ला पोलिसांनी आरोपी बाळकृष्ण विजय कुबल यास अटक करून सोमवारी कुडाळ न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पोलीस तपासासाठी एक दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, बाळकृष्ण कुबल याला एका दिवसाच्या पोलिस कोठडीनंतर मंगळवारी कुडाळ न्यायालयात हजर केले असता त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.