*वीज कंपनीचा असाच खेळ सुरू राहिल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही – सागर जाधव*

*वीज कंपनीचा असाच खेळ सुरू राहिल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही – सागर जाधव*

*कोंकण एक्सप्रेस*

*वीज कंपनीचा असाच खेळ सुरू राहिल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही – सागर जाधव*

*मालवण (प्रतिनिधी)*

पहिल्याच पडलेल्या अवकाळी पावसात वीज महावितरण कंपनी तोंडावर आपटली असून वीज कंपनीचा संपूर्ण बोजवारा उडाल्याचे दिसून आले. वीज पुरवठा खंडित झाल्याने मालवण वासियांना मोठा त्रास सहन करावा लागला. येत्या पावसाळ्यात वीज महावितरण कंपनीचा असाच खेळ सुरू राहिल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही, असा इशारा मनसेचे मालवण शहराध्यक्ष सागर जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.

काल अवकाळी पावसाचा जोर सगळीकडे जिल्हाभर सुरू झाला आणि नेहमीप्रमाणे महावितरण कंपनी मालवण मध्ये तोंडावर आपटलेली पाहायला मिळाली. त्याचा त्रास मालवणवासीयांना गेले २४ तासाहून अधिक सहन करावा लागतोय. अवकाळी पावसाचा जोर कमी झाला तरीही शहरात वीज पुरवठा खंडितच आहे. अजून पावसाळ्याचे पूर्ण चार महिने शिल्लक आहेत. मग पुढील पावसाळ्याच्या दिवसात असाच विजेचा लपंडाव मालवणवासीयांनी सहन करायचा का? असा प्रश्न सागर जाधव यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे मालवण शहर पर्यटन दृष्ट्या विकसित होत आहे. त्यावर अवलंबून असलेले हॉटेल तसेच इतर व्यवसायिक सध्या हवालदिल झालेले पाहायला मिळत आहेत. मालवण शहराला महावितरणचे हे लागलेले ग्रहण सोडवायला कोणीही सत्ताधारी नेतेमंडळी पुढे येताना दिसत नाही. यावर कोणीही एक शब्द बोलायला तयार नाही. फक्त भरमसाठ आलेली विजेची बिले भरण्यासाठी तगादा लावण्यात महावितरण कंपनी सर्वात पुढे दिसून येते. मग ग्राहकांना सेवा देताना तोंडावर का पडला असा प्रश्न श्री. जाधव यांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी स्थानिक आमदारांनी गांभीर्याने लक्ष द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच यापुढे येत्या पावसाळ्यात असाच विजेचा लपंडाव सुरू राहिल्यास महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही असा इशाराही जाधवं यांनी पत्रकातून दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!