*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ल्यात भर पावसात तिरंगा यात्रा*
*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*
भारतीय सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठी वेंगुर्ला शहरात मंगळवारी भर पावसात तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेत ‘भारत माता की जय‘, ‘वंदे मातरम्‘ अशा घोषणा देण्यात आल्या.
पेहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान पुरस्कृत दहशदवादाचे कंबरडे मोडले आणि पाकिस्तानला धडा शिकवत त्यांची जागा दाखवली. आपल्या अतुल्य पराक्रमाने भारतीय सैन्याने देशाची मान अभिमानाने उंचावली, यासाठी सैन्याचे मनोबल वाढावे म्हणून २० मे रोजी सायंकाळी वेंगुर्ला शहरात तिरंगा यात्रा काढण्यात आली. यात्रेपूर्वीच पावसाने जोरदार हजेरी लावली. अशाही परिस्थितीत देशभक्तांनी एकत्र येत तिरंगा यात्रा यशस्वी केली. ही यात्रा दाभोली नाका येथे सुरू होऊन बाजारपेठ मार्गे, बॅ.नाथ पै रोड, पिराचा दर्गा ते पुन्हा दाभोली नाका अशी काढण्यात आली. यात बहुसंख्य देशभक्त सहभागी झाले होते.