कळणे येथील तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू

कळणे येथील तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू

*कोंकण एक्सप्रेस*

*कळणे येथील तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू…*

*दोडामार्ग ः शुभम गवस*

कळणे येथे विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रताप रामराव देसाई (वय २९) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज दुपारी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रताप यांच्या घराचे काम सुरू आहे. त्यामुळे त्यांनी घरातील सर्व सामान त्यांच्या चुलत्यांच्या घरी वरच्या मजल्यावर ठेवले होते. दोन दिवस मुसळधार पाऊस असल्याने सामान भिजले तर नसावे ना हे पाहण्यासाठी तो वर गेला होता. मात्र बराच वेळ तो माघारी परतला नाही. यावेळी कुटुंबीय त्याला पाहण्यासाठी गेले. यावेळी प्रताप जमिनीवर निपचित पडले असल्याचे दिसले. त्यांनी त्याला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याची काहीच हालचाल नसल्याने त्याला तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याला तपासले असता तो रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले. प्रतापच्या अकाली निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या घरची परिस्थिती बेताची आहे. तो गोव्यात एका खाजगी कंपनीत कामाला होता. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, काका, काकी व चुलत भाऊ असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!