*कोंकण एक्सप्रेस*
*शिवसेना ठाकरे कलमठ बिडेवाडी तर्फे 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील कलमठ बिडेवाडी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे 10वी व 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमात माजी सरपंच धनश्री मेस्त्री, शिवसेना तालुका संघटक राजू राठोड, आशिष मेस्त्री, अर्चना कोरगावकर, हेमंत कांडर, शशिकांत मेस्त्री, नागेश मेस्त्री, तन्मय सावंत, व कौस्तुभ डगरे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सत्कार करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणेः
दीक्षा मेस्त्री, हर्षदा मेस्त्री, वैष्णवी कोरगावकर, गौरेश मेस्त्री, वैभवी लाड, दूर्वा नाडकर्णी, यश नाडकर्णी, रसिका सातारकर, आणि श्रुती कांबळे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्याचा व त्यांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश ठेवण्यात आला होता..