नियम पाळा, अन्यथा राज्यात लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता

नियम पाळा, अन्यथा राज्यात लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता

*कोकण Express*

*नियम पाळा, अन्यथा राज्यात लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता*

*मुंबई :*

राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून नियमित सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. सरकारने घालून दिलेले नियम नागरिकांकडून पाळण्यात येत नसल्याने राज्य सरकार आता कडक लॉकडाऊन लावण्याच्या विचारात आहे. आज त्यासंर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत लॉक़डाऊनबाबतचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात निर्बंध आणि नियमांचं कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा यावरही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
बैठकीतील महत्वाचे निर्णय :
मर्यादित दिवसांसाठी लॉकडाऊन लावावे. त्याची कार्यपद्धती ( एसओपी) मदत व पुनर्वसन प्रधान सचिव यांनी तयार करावी. जेणे करून नियोजनबद्धरीतीने लॉकडाऊनची अंमलबजावणी करता येईल.
ऑक्सिजनची महत्वाची भूमिका असल्याने तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहावा
गृह विलगीकरण करण्यापेक्षा संस्थात्मक विलगीकरणकरण्यावर भर द्यावा
मृत्यू पुढे जाऊन वाढू शकतील त्यामुळे ई आयसीयू, व्हेंटीलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे
प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ मिळण्यासाठी खासगी डॉक्टर्सची सेवा घ्यावी
विशेषत: वृद्ध व सहव्याधी रुग्णांना प्राधान्याने उपचार मिळावेत
सहव्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम पद्धतीतून काम करू द्यावे
लॉकडाऊनच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करा- मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत स्पष्ट निर्देश दिले की, एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय. मात्र, अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होत नाही. विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत. तसंच बाजारपेठांमध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्क याचं पालन होताना दिसत नाही. शेवटी लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल, असं समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी मुख्य सचिवांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!