*कोंकण एक्सप्रेस*
*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि मनसे विद्यार्थी सेनेचे नेते अमित ठाकरे आणि मनविसे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालयात फळ आणि बिस्कीट वाटप*
*कणकवली ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि मनसे विद्यार्थी सेनेचे नेते श्री. अमित ठाकरे आणि मनविसे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर मोरे यांच्या वाढदिवसा निमित्त मनविसे जिल्हाध्यक्ष श्री. अनिकेत तर्फे आणि मनसे कणकवली शहर अध्यक्ष श्री. योगेश कदम यांनी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात फळ आणि बिस्कीट वाटप केले तसेच कणकवली येथील प्रसिद्ध भालचंद्र महाराजांच्या मठात प्रसाद वाटप केले.
यावेळी मठाच्या पूजार्यांकडून श्री. अमित साहेब ठाकरे आणि श्री. ज्ञानेश्वर मोरे यांना दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा व्यक्ती करण्यात आली.
मनसे उपजिल्हा अध्यक्ष श्री. गणेश वाईरकर आणि मनसे विद्यार्थी सेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले फळ आणि बिस्कीट वाटप.
प्रसंगी आयोजक आणि मनविसे जिल्हाध्यक्ष श्री. अनिकेत तर्फे, मनसे कणकवली तालुका अध्यक्ष श्री. शांताराम सादये, शहर अध्यक्ष श्री. योगेश कदम, महाराष्ट्र सैनिक श्री. सागर पोहरकर, कु अक्षय जळगावकर उपस्थित होते.