खाजगी कंपन्यांच्या टार्गेट पूर्ततेत बीएसएनएलचा हात; उबाठा शिवसेनेचा आरोप…

खाजगी कंपन्यांच्या टार्गेट पूर्ततेत बीएसएनएलचा हात; उबाठा शिवसेनेचा आरोप…

*कोंकण एक्सप्रेस*

*खाजगी कंपन्यांच्या टार्गेट पूर्ततेत बीएसएनएलचा हात; उबाठा शिवसेनेचा आरोप…*

*माजी खासदार विनायक राऊत संतप्त….*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

माजी खासदार विनायक राऊत यांनी आज सोमवारी सावंतवाडी येथील बीएसएनएल कार्यालयात धडक दिली.

यावेळी कोलमडलेल्या बीएसएनएल सेवेबाबत जिल्हा प्रबंधक रविकिरण जुत्रू यांच्यावर उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यां कडून प्रश्नाचा भडिमार करण्यात आला. खाजगी मोबाईल कंपन्यांची टार्गेट पूर्ण करण्यात बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांचा हात असल्याने जिल्ह्यात बीएसएनएलची सेवा सुधारत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तर येत्या काही दिवसात सेवा सुधारा. अन्यथा, कार्यालयाला टाळे ठोकून कामकाज बंद पाडावे लागेल असा इशारा माजी खासदार विनायक राऊत यांनी दिला.

सावंतवाडी मतदारसंघासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलमडलेल्या बीएसएनएल नेटवर्कबाबत आणि अन्य विविध समस्यांबाबत श्री. राऊत यांनी जिल्हा प्रबंधक श्री. जुत्रू यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक बीएसएनएल कार्यालयात घेतली. यावेळी त्यांनी गावागावातील बीएसएनएल टॉवर आणि तेथील समस्यांबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब, दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, सावंतवाडी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, शहर प्रमुख शैलेश गौंडळकर, रमेश गावकर, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, उपसरपंच महेश गावडे, माजी सरपंच सुनील गावडे, रमेश गावकर, मंदार शिरसाट योगेश धुरी विनोद ठाकूर, सागर नाणोसकर, उमेश नाईक, अवी धातोंडकर, विजय देसाई, मिलिंद नाईक, लक्ष्मण आयनोडकर, संदेश वरक आदी उपस्थित होते.

यावेळी दाभोळ गावात टॉवर उभा करुनही अनेक वर्ष तो बंदच असल्याबाबत लक्ष वेधण्यात आले. तसेच सोनुर्ली येथील टॉवर विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर बंद पडतो त्या ठिकाणी बॅटरी बॅकअप चोरीला गेले. वांगणी येथे हरिचरणगिरी टॉवरबाबत येथील सरपंचांनी उपोषण करून सुद्धा अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे अद्यापपर्यंत मोबाईल टॉवर कार्यान्वित करण्यात आलेला नाही. या आठ दिवसात टॉवर सुरु न झाल्यास आपण कायदा हातात घेणार असल्याचे सरपंच श्री. मातोंडकर यांनी सांगितले. तर आठ दिवसात या टॉवरचे काम मार्गी लावा अन्यथा हा माझ्यासह गावातील ग्रामस्थांना घेऊन आपण कार्यालयात धडक देऊ असा इशारा श्री. राऊत यांनी दिला.

दरम्यान ग्रामस्थांच्या समस्या आणि बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांची हलगर्जपणा लक्षात घेता माजी खासदार विनायक राऊत यांनी श्री. जुनू यांना पुढील बैठकीपूर्वी सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत असे सुचित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!